esakal | Video : ...अरे बापरे गाईला झालाय ‘कोविड’!
sakal

बोलून बातमी शोधा

Video : ...अरे बापरे गाईला झालाय ‘कोविड’!

ऐकावं ते नवलंच! आपण नेहमीच चमत्कारीत नावे ऐकत असतो किंवा एखाद्या  ट्रेंड नुसार नाव ठेवत असतो. असंच एका व्यक्तीच नव्हे, तर चक्क एका वासराचे नाव "कोविड" ठेवले आहे. हे वासरू आहे काळेवाडीतील  माजी नगर सेवक  मच्छिंद्र तापकीर यांच्या गाईचे. या गाईने चार दिवसापूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला. तापकीर कुटुंबियांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मलेल्या वासराचे अजब नामकरण केल्याने या नावाची चर्चा सगळ्या पंचक्रोशित रंगली आहे.

Video : ...अरे बापरे गाईला झालाय ‘कोविड’!

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - ऐकावं ते नवलंच! आपण नेहमीच चमत्कारीत नावे ऐकत असतो किंवा एखाद्या  ट्रेंड नुसार नाव ठेवत असतो. असंच एका व्यक्तीच नव्हे, तर चक्क एका वासराचे नाव "कोविड" ठेवले आहे. हे वासरू आहे काळेवाडीतील  माजी नगर सेवक  मच्छिंद्र तापकीर यांच्या गाईचे. या गाईने चार दिवसापूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला. तापकीर कुटुंबियांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मलेल्या वासराचे अजब नामकरण केल्याने या नावाची चर्चा सगळ्या पंचक्रोशित रंगली आहे.

तापकीर यांच्या गोठ्यातील मनु नावाच्या गाईने सोमवारी (ता. १३) रोजी सायंकाळी एका गोंडस वासराला जन्म दिला. विशेष म्हणजे त्याच्या जन्मानंतर गाईने या पिल्लाच्या जवळपासही कोणाला फिरकू दिलेले नाही. कारण त्या गाईला मास्क लावलेल्या तापकीर यांची ओळख झाली होती. सध्या जगभर कोविड व कोरोना या नावाचीच चर्चा असल्याने तापकीर यांनीही गाईला कारवड झाली तर तीच नाव कोरोना ठेवणार होते, आणि वासरू झाले तर "कोविड" नाव ठेवण्याचा त्यांनी मानस केला होता. त्यामुळे  या वासराचे नावदेखील ‘कोविड’ असे ठेवले. पूर्ण मार्च महिन्यापासून तोंडाला मास्क लावून तापकीर गाईचे संगोपन  करत होते. ती  गाई त्यांना ओळखू लागली होती. पण मास्क न लावता गेल्यावर गाई ओळखत नसायची.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तापकीर म्हणाले, 'सध्या सगळीकडे कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूचीच धास्ती असून या कोरोनामुळे माणूसही माणसापासून दूर झालेला आहे. या लॉकडाऊनच्या दिवसांच्या आणि कोरोनाच्या आठवणी पुढील अनेक वर्षे माणसांच्या मनात राहतील. आमच्या मनु नावाच्या गाईने वासराला जन्म दिल्यानंतर या वासराचे नामकरण काहीतरी वेगळे करण्याचा आमचा मानस होता. त्यामुळे या वासराचे सध्या जगभर चर्चा असलेले ‘कोविड’ असे नामकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

loading image