coronavirus :पिंपरीतील एकाचा मृत्यू; पाॅझिटिव्ह संख्या 31

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

 शहरातील आणखी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 31 झाली. तर, एका 42 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पिंपरी - शहरातील आणखी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे बाधितांची संख्या 31 झाली. तर, एका 42 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 12 जण उपचारानंतर बरे होऊन घरी पोचले आहेत. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत आणखी दोघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संख्या 31झाली आहे. सध्या 18 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी मृत्यू झालेली व्यक्ती गुरुवारी (ता. 9) वायसीएममध्ये दाखल झाली होती. तत्पुर्वी श्र्वास घेण्यास त्रास होत असल्याने घरानजिकच्या दवाखान्यात ते गेले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना वायसीएममध्ये पाठवले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांचा एनआयव्हीकडील अहवाल शुक्रवारी पाॅझिटिव्ह आला होता. हिंजवडी परिसरात ते कंत्राटी कामगार होते. मात्र, त्यांचा आयटी पार्कमधील कंपण्यांशी काही संबंध नव्हता.

दरम्यान, आजपर्यंत एकूण 822 व्यक्तींच्या घशातील नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले. त्यातील 730 निगेटिव्ह आले आहेत. रविवारी 65 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead due to corona in pimpri

Tags
टॉपिकस
Topic Tags: