Lockdown : 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू 

Online class of ITI students started during lockdown
Online class of ITI students started during lockdown

पुणे : 'कोरोना' लाॅकडाऊनमुळे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोज दोन तास प्राध्यापकांनी ऑनलाईनशिकवावे तसेच त्यांच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. सध्या रोज ३८६ आयटीआय मध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे. 

 हे पण वाचा - "लॉकडाउन'चा नद्यांच्या प्रदूषणस्तरावर परिणाम नाही
पारंपरिक आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाप्रमाणेच 'आयटीआय' मधील विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनचा फटका बसला आहे. लॉकडाऊन लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके आणि सैद्धांतिक विषयांचे मार्गदर्शन ऑनलाइन मिळणार आहे. व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या 'लर्निंग मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टम'च्या माध्यमातून अभ्यास साहित्य निर्माण केले आहे. 

ती'च्या करिता मातोश्री'वरून सूत्रे हलली अन्'
'वर्कशॉप कॅल्क्यूलेशन', 'वर्कशॉप सायन्स', 'इंजिनिअरिंग ड्रॉइंग', 'एम्प्लॉयबिलिटी स्किल्स', 'फिटर', 'टर्नर' या विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षकांनी त्याचा वापर करून आणि व्हिडीओ कॉलिंग प्रणालींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घ्याव्यात, अशा सूचना संचालनालयाने दिल्या आहेत.

विभागाने युट्यूब चॅनेल तयार केली असून, त्यावरही विविध विषयांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रत्येक विषयांचे रोज किमान दोन तास ऑनलाइन वर्ग भरवणे संचालनालयाने बंधनकारक केले आहे. राज्यात ४१७ शासकीय 'आयटीआय' संस्था आहेत. त्यापैकी ३८६ संस्थांमध्ये ऑनलाईनशिक्षण व प्रशिक्षण याची व्यवसाय झाली आहे. तर ३१ ठिकाणी झालेली नाही.

विभाग आणि ऑनलाईनक्लाससाठी जोडलेले आयटीआय

विभाग     -आयटीआय संख्या   -ऑनलाईनजोडलेले संस्था
अमरावती    - ६३                  -         ६१
औरंगाबाद   - ८२                 -          ८१ 
मुंबई          -  ६७                -          ५७
नागपूर        - ७६                 -          ७०
नाशिक       - ६८                  -         ६३
पुणे            -  ६१                   -       ५४
एकुण       -  ४१७                 -       ३८६

"ऑनलाईन क्लास सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षक हे संपर्कात असून, अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे. शिकवलेल्या अभ्यासक्रमाची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. 'आयटीआय'ची वार्षिक परीक्षा जुलै महिन्यात असते, त्यामुळे 'कोरोना'चा परीक्षांवर फरक पडणार नाही."
- प्रकाश सायगांवकर, प्राचार्य, आयटीआय, औंध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com