
सविता माने यांनी आदित्य ठाकरे यांना सर्व हकीकत सांगितली. आदित्य यांनी सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आमच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मदत मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर मातोश्रीवरून सुत्रे हलली
वडगाव शेरी(पुणे) : दुचाकी अपघातात जखमी होऊन दहा दिवसांपासून घरीच अंथरुणावर खिळलेल्या पुण्यातील एका महिलेच्या मदतीसाठी आज थेट मातोश्रीवरून सूत्रे हलली. स्वतः आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील स्थानिक शिवसैनिकांना सूचना दिल्यावर औषधे आणि शिध्याची मदत महिलेच्या घरी दहा मिनिटांत पोहोचली. पुण्यातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या सविता माने यांना हा सुखद अनुभव आला.
हे पण वाचा - "लॉकडाउन'चा नद्यांच्या प्रदूषणस्तरावर परिणाम नाही
सविता माने यांचा त्यांच्या भावाच्या दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. त्यात त्यात हात फ्रॅक्चर झाला. शरीराला इतर ठिकाणीही मार लागला. प्राथमिक उपचार केल्यानंतर आठवडाभराची औषधे घेऊन त्या पर्वती पायथा येथील जनतावसाहत येथील घरीच उपचार घेत होत्या. मात्र आठवड्यानंतर औषधे संपली. हातावरचे पोट असल्याने घरी अन्नाचा कण नव्हता. त्यामुळे सविता यांनी पाच दिवस बिस्कीट पुड्यावर दिवस काढले.
गृहमंत्रालयात उपासमारीची तक्रार; तरुणाला मिळाले तत्काळ धान्य
लॉकडाऊन काळात संपर्क केल्यावर स्थनिक राजकीय मंडळींनी मदतीचे फक्त आश्वासन दिले. मात्र कोणत्याही प्रकारची मदत त्यांना मिळाली नाही. जखमी अवस्थेत चालता येत नसल्यामुळे आणि लॉकडाऊन असल्याने सविता यांना लागणारी महागडी औषधे आणि शिद्याची गरज होती. मदतीसाठी आज त्यांना त्यांच्या एका बाहेरगावच्या नातेवाईकाने कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोन नंबर मिळवून दिला. सविता यांनी लगेच सदर क्रमांकावर संपर्क साधला आणि सुदैवाने त्यांचा थेट आदित्य ठाकरे यांच्याशी आज सकाळी संपर्क झाला.
- लॉकडाउनच्या काळात शहरातील विद्यार्थ्यांसोबत होतोय भेदभाव!, वाचा सविस्तर...
सविता माने यांनी आदित्य ठाकरे यांना सर्व हकीकत सांगितली. आदित्य यांनी सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात आमच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मदत मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर मातोश्रीवरून सुत्रे हलली आणि पुण्यातील शिवसेनेचे पदाधिकारी नितीन भुजबळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. नितीन भुजबळ यांनी पर्वती येथील शिवसेनेचे पदाधिकारी सुरज लोखंडे त्यांच्याशी संपर्क साधला. ते तत्काळ सविता यांच्या घरी पोहोचले आणि काही मिनिटातच आवश्यक असलेली सर्व औषधे आणि शिध्याची मदतही सविता यांच्या घरी पोहोचली.
शेतकऱ्यांचा माल घरातच पडून, सरकार कधी खरेदी करणार?
याविषयी सविता माने म्हणाल्या, ''मी घर काम करते. घरातील अन्नपाणी औषधे संपली होती. म्हणून मी धाडस करून आदित्य साहेबांना फोन लावला. आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. लॉकडाऊनच्या संकट काळातही काही मिनिटांत मला औषधे व शिध्याची मदत पोहोचली. उद्या सिटीस्कॅन करण्यासाठी शिवसैनिक मला रुग्णालयात नेणार आहेत. महाराष्ट्राला असे नेतृत्व लाभले याचा मला अभिमान वाटतो.''
दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द; नववी, अकरावीचा निर्णय वाचा!