Coronavirus : कसला कोरोना अन्‌ कसला बंद?

पिंपरी कॅम्प - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापारी असोसिएशनने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. मात्र, बुधवारी पिंपरी बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने व नागरिकांची वर्दळ.
पिंपरी कॅम्प - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापारी असोसिएशनने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. मात्र, बुधवारी पिंपरी बाजारपेठेत सुरू असलेली दुकाने व नागरिकांची वर्दळ.

पिंपरी - पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांनी कोरोना विरोधातील मोहिमेला हरताळ फासल्याचे धक्कादायक चित्र बुधवारी दिसले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथील बहुतांश दुकाने उघडी ठेवून व्यापाऱ्यांनी शहरवासीयांचे आरोग्य धोक्‍यात आणले. त्यांच्याविरोधात प्रशासनाने कोणत्याही कारवाईचे पाऊल उचललेले नाही. त्यामुळे सर्व थरातून संताप व्यक्त होत आहे.

शहरातील ही एक मोठी बाजारपेठ आहे. वर्षभर ती गजबजलेली असते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत या बाजारपेठेचा लौकिक खराब होत आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यांवर अतिक्रमणे, कायद्याचे सर्रास उल्लंघन, ग्राहकांशी उर्मट भाषा, मारामारी यांसाखे प्रसंग व्यापाऱ्यांकडून होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनामुळे सगळीकडे जनजागृती सुरू असताना येथील व्यापाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होण्याऐवजी कायद्याचेच उल्लंघन केले जात आहे. एकीकडे पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंदला प्रतिसाद दिला आहे, तर दुसरीकडे पिंपरीतील व्यापाऱ्यांनी घेतलेल्या नकारात्मक भूमिकेचा निषेध केला जात आहे. 

पिंपरी क्‍लॉथ असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू जोधवानी म्हणाले, ‘‘फेडरेशन ऑफ असोसिएशनच्या बैठकीला मला जाता आले नव्हते. मात्र बंद जाहीर केल्याचे समजले. त्यानुसार दुपारी १२ वाजेपर्यंत आम्ही दुकाने बंद ठेवली होती. परंतु पिंपरी कॅम्पमध्ये बरीच दुकाने भाड्याने घेतली गेली आहेत. भाडेकरू दुकानदारांनी दुकाने उघडण्यास सुरवात केली. त्यामुळे बाजारपेठ खुली राहिली.’’

पिंपरी इलेक्‍ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष देवराज सबनानी म्हणाले, ‘‘आम्ही सर्व सदस्यांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. परंतु आर्य समाज चौकाजवळील दोन व्यापारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी स्वतःची दुकाने चालूच ठेवली. ते पाहून इतर इलेक्‍ट्रिकल्सची दुकाने हळूहळू उघडली गेली. आम्ही बैठक घेऊन परत बंदबाबत निर्णय घेऊ.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com