Coronavirus : भोसरीत ‘पीएमपीएल’च्या २५ टक्केच बस रस्त्यावर

धावडेवस्ती, भोसरी - पीएमपीएमएलने भाडेतत्त्वावरील बसची वाहतूक बंद केली आहे.
धावडेवस्ती, भोसरी - पीएमपीएमएलने भाडेतत्त्वावरील बसची वाहतूक बंद केली आहे.

भोसरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘पीएमपीएमएल’ बसची संख्या पंचवीस टक्‍क्‍यांनी कमी केली आहे. भोसरी परिसरातील पीएमपीएमएलने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसच्या सर्व फेऱ्या बंद केल्या आहेत. 

सरकारने जमावबंदी लागू केल्याने भोसरी, इंद्रायणीनगर परिसरातील दुकाने सलग तिसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरात शुकशुकाट आहे. प्रवाशांच्या कमतरतेमुळे तुरळक प्रवाशांसह बस मार्गांवर धावत आहेत. 

पीएमपीएमएल आणि बीआरटीएसने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाडेतत्त्वावरील बस बंद केल्याची माहिती अँथनी गॅरेजचे व्यवस्थापक संपत शिळीमकर यांनी दिली. प्रवासीच नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर प्रवाशांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. काही खासगी वाहन चालकही प्रवासी नसल्याने घरीच थांबणे पसंत करीत आहेत. प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती बीआरटीएस टर्मिनलचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे, पीएमपीएमएलच्या राजगुरुनगर बस थांब्याचे नियंत्रक सुरेश कवडे व गव्हाणे वस्तीतील बसथांब्याचे नियंत्रक रामदास लांडगे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com