Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांनी दिले 747 जणांना पास

Emergency-Pass
Emergency-Pass

Coronavirus : पिंपरी - 'लॉकडाऊन'च्या  कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मागील पाच दिवसांत 747 जणांना पास देण्यात आले आहेत.  

'लॉकडाऊन'मध्ये अनेकदा अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांची तसेच कर्मचाऱ्यांची अडवणूक केली जाते. या सेवा पुरविणाऱ्याची ही गैरसोय टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पास दिले जात आहेत. 

पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी, दिघी, चाकण, आळंदी पोलिस ठाणे व म्हाळुंगे पोलिस चौकी या हद्दीसाठी चिंचवड स्टेशन येथील पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 या कार्यालयातून 227 जणांना पास दिले आहेत. तर हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे व रावेत, शिरगाव पोलिस चौकी या हद्दीसाठी परिमंडळ 2 कार्यालयातून 489 जणांना तर पोलिस आयुक्तालयातून 31 जणांना पास मिळाले आहेत. अशाप्रकारे मागील पाच दिवसांत आयुक्तालयाच्या हद्दीत 747 जणांना  पास दिले आहेत. या पाससाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागत आहे.

पुणे पोलिसांनी डिजीटल पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, यामध्ये तातडीक कामाव्यतिरिक्त पास घेणाऱ्यांचेही प्रमाण अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्तीने प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधल्यानंतर खात्री करूनच पास दिले जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com