Coronavirus : पुण्यात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून मिळतायेत व्यायामाचे धडे; व्हिडिओ पाहाच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू आहे. अशात अनेकजण घराबाहेर पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काही भागात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून व्यायामाचे धडे मिळत आहेत.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू आहे. अशात अनेकजण घराबाहेर पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील काही भागात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून व्यायामाचे धडे मिळत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची व मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. या परिसरात कासेवाडी लोहियानगर व हरकानगर आदी झोपडपट्टीचा भाग आहे. हातावरचे पोट असल्याने महिन्याभराचे रेशन भरणे येथे अनेकांना शक्य होत नाही. तिखट मिठ सारख्या अनेक छोट्या मोठ्या वस्तू विकत घेण्यासाठी ही लोक सतत बाहेर पडत असतात. त्याच बरोबर कारण नसतानाही मोकाट फिरणाऱ्यांची संख्या ही शेकडो असते. यावेळी लोक ऐकत नसल्यामुळे पोलिसांच्या ही नाकी नऊ आले आहे. अशावेळी  मोकाट फिरणाऱ्यांना आता पोलिसांकडून रस्त्यावरच शिक्षा म्हणून व्यायामाचे धडे दिले असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळाले.

 
Coronavirus : आम्हाला मदत करा, पाकिस्तानची भारताकडे औषधांची मागणी

या क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणारे भाग संवेदनशील असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा आणखी कठोर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नगरसेवकांकडून केली जात आहे. तसेच, अनेक भागात औषध फवारणी होत नसल्याची खंत ही नागरिकांनी  व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Exercise lessons get from the police