Coronvirus : पुणेकरांना शनिवारपासून घरपोच मिळणार 12 लाख लिटर दूध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

शहरात सुमारे 12 लाख लिटर दूध पुणेकरांना शनिवार पासून घरपोच मिळणार आहे. त्या साठीचे पोलिस आणि संबंधित पुरावठादारांचे नियोजन शुक्रवारी पूर्ण  होणार आहे.

पुणे : शहरात सुमारे 12 लाख लिटर दूध पुणेकरांना शनिवार पासून घरपोच मिळणार आहे. त्या साठीचे पोलिस आणि संबंधित पुरावठादारांचे नियोजन शुक्रवारी पूर्ण  होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यावश्यक सेवांचा एक भाग म्हणून किराणा दुकानदार यांचे घाऊक व्यापारी त्याचप्रमाणे फळे भाजीपाला यांचे वितरक आणि दुधाच्या वितरकांना योग्य ते अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत पास देण्याची प्रक्रिया पोलिसांनी वेगाने सुरू केली आहे. या संदर्भामध्ये पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवांच्या  पुरवठादारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या वेळेला हे पास तातडीने देण्याचे नियोजन करण्यात आले.

चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं ९४ व्या वर्षी निधन

पुण्यामध्ये चितळ चे सुमारे साडेचार लाख लिटर दूध वितरित होते, अशी माहिती इंद्रनील चितळे यांनी दिली. तर गोकुळचे सुमारे सव्वातीन लाख लिटर दूध वितरित होत असल्याचे वितरक संजय ढेरे यांनी नमूद केले. कात्रजचे सुमारे दोन लाख लिटर दूध वितरित होते. अमूल, सोनई तसेच अन्य ब्रँडचे सुमारे दोन लाख लिटर दुधाचे वितरण होते. त्यामुळे सुमारे बारा लाख लिटर दूध पुणेकरांना शनिवारपासून घरपोच मिळणार आहे.

Coronavirus : १४ एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने रद्द !

 याबाबत सह आयुक्त शिसवे म्हणाले ''अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत आवश्यक घटकांना त्यांच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी देण्यात येणारे पास आज दिवसभरामध्ये वितरीत करण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punekars will receive 12 lakh liters milk from Saturday at home