Corona Virus : घरात रहा नाहीतर दुष्परिणाम भोगा;जर्मनीतून राहूलची कळकळीची विनवणी

Rahul Wagh Stuck In Germany is Requesting Indians to stay Safe Corna Virus
Rahul Wagh Stuck In Germany is Requesting Indians to stay Safe Corna Virus

पुणे : "सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेल्या युरोपीयन देशात कोरोनाने थैमान घातले आहे, आपल्याकडेतर तेवढ्या सुविधाही नाहीत. त्यामुळे पुढचे 15-20 दिवस खुप महत्वाचे आहेत, काम धंदा सोडा, तिथे आहात तेथेच रहा, स्वताःची आणि कुटूंबाची काळजी घ्या नाही. अन्यथा दुष्परीणाम भोगण्यास तयार रहा.'' ही काहीशी संतापाची पण तेवढीच काळजीव्यक्त करणारी भावना आहे जर्मनीमध्ये रहाणाऱ्या राहूल वाघ या तरुणाची. राहूल हा मुळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील वागेबगुळ गावातील आहे. तो नोकरीनिमित्त जर्मनीमध्ये आहे.

"जर्मनीमध्ये 22 हजार पेक्षा जास्त जणांना "कोरोना'ची लागण झाली असून, 85 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत त्याने स्वताःला सहा दिवसांपासून घरात कोंडून घेतले आहे. त्याने फेसबुक लाईव्हद्वारे त्याने युरोपातील भयावह स्थितीचे कथन करताना महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षीत राहण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राहूल म्हणतो, "युरोपातील स्थिती बघून माझी झोप उडाली आहे. आपण कधीही विचार केला नव्हता अशी परस्थिती निर्माण झाली आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ब्रिटनमधली सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्यास आली आहे. या देशांनी दोन महिन्यांपूर्वी ज्या काळजी घ्यायाल हवी होती, ती न घेतल्याने ते परिणाम भोगत आहेत. प्रगत देशांची ही अवस्था असेल तर आपल्या देशाची काय अवस्था होऊ शकते याचा विचार करा.''

Virus : पुणे - मुंबई प्रवास करणार आहात? थांबा...
"आपल्याकडचे लोक अजूनही जागृत झालेले नाहीत, तुम्ही जिथे असाल तेथेच थांबा, कामधंदे सोडून द्या, फक्त कसे वाचायचे याचा विचार करा, सरकार सांगेल ते ऐका. तुम्हाला घरचे गावाकडे बोलावत असले तरी त्यांना समजून सांगा आणि पुढचे 15-20 दिवस जेथे असला तेथे साधव रहा. पुढे भयंकर अनाधुंदी माजणार , त्यामुळे आपल्याला काही होणार नाही अशा मस्तीत राहून फिरत रहू नका. तुमच्या आणि तुमच्या कुटूंबीयांची काळजी करा, हे गांभीर्य ओळखा,' असे आवाहन करताना राहूलला गहीवरून आले होते.

पुणेकरांनो, आता पुर्णवेळ घरातच बसा कारण, पुणे पोलिसांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

डोळे उघडणारे लाईव्ह
"जनता कर्फ्यू'च्या पूर्वी राहूलचे फेसबुक लाईव्ह व्हायरल झाले. रविवारी संध्यकाळी अत्यावश्‍यक सेवांना अभिवादन करण्यासाठी ज्या प्रमाणात रस्त्यावर आले, गोंधळ घातला, फटाके फोडले त्यावरून "कोरोना'चा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. राहूलच्या लाईव्हमध्ये नेमक्‍या अशा प्रकारचेच वर्तन टाळण्याचे त्याने आवाहन केले होते, त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ समाजाचे डोळे उघडणारा ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com