कोरोनाबाधित मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे,त्यामध्ये 55 ते70 वयोगटातील संख्या अधिक आहे.त्यापैकी बहुतांश लोकांना उच्च रक्तदाब,मधुमेहासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने विभागीय आयुक्त कार्यालयात सद्यःस्थिती आणि उपाययोजनांबाबत नुकताच आढावा घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विभागीय आयुक्तांनी पथकासमोर मांडलेले मुद्दे : 
1) पुणे विभागामध्ये शहरात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे.यामागे येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण असले तरी ज्या व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये 55 ते 70 वयोगटातील संख्या अधिक आहे.त्यापैकी बहुतांश लोकांना उच्च रक्तदाब,मधुमेहासारखे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2) जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य आणि पोलिस प्रशासन समन्वयाने काम करीत आहेत. 

3) कोरोनाबाधितांची संख्या पाहता शहरातील सर्व रुग्णालये सक्षम केली आहेत.विविध पथके करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. 

4) लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी पोलिस व महसूल प्रशासनाकडून सुरू असून काही दिवसांत परिस्थिती निश्‍चित नियंत्रणात येईल. 

5) ससूनमध्ये सुविधा वाढविल्या असून, काही खासगी रुग्णालयांबरोबर करार केला आहे. 

6) भविष्यात कोरोनाच्या अनुषंगाने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्‍यक नियोजन केले आहे. 

7) गरिबांना रेशन दुकानांमधून अन्नधान्य वितरण आणि अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भोजनाचे नियोजन. 

केंद्रीय पथकाच्या प्रशासनाला सूचना : 
1) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी व्हावी 
2) धान्य वितरण सुव्यवस्थितपणे व्हावे. 
3) कोरोनाविषयी जागरूक राहावे, पण भीती न बाळगण्याबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा 
4) सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior citizens among the corona-affected dead