आतापर्यंत राज्यातील एवढे रुग्ण झाले बरे; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

राज्यभरातील दहा हजार कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत तब्बल पावणेदोन हजार रुग्ण ठणठणीत झाल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याने गुरुवारी जाहीर केले आहे. त्यात विविध शहरांमधील 180 रुग्ण गुरुवारी एका दिवसात बरे झाले आहेत. याच दिवसभरात 583 नवे रुग्ण सापडले असून, कोरोनाने27 जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 459 झाला आहे.

पुणे - राज्यभरातील दहा हजार कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत तब्बल पावणेदोन हजार रुग्ण ठणठणीत झाल्याचे राज्याच्या आरोग्य खात्याने गुरुवारी जाहीर केले आहे. त्यात विविध शहरांमधील 180 रुग्ण गुरुवारी एका दिवसात बरे झाले आहेत. याच दिवसभरात 583 नवे रुग्ण सापडले असून, कोरोनाने27 जणांचा जीव घेतला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 459 झाला आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

दरम्यान, या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची फारशी वाढली नाही. तेव्हाच, या रोगापासून बरे होण्याचे प्रमाण मात्र वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत येत आहे.

मृत व्यक्तींमध्ये 19 पुरुष, आठ महिला आहे. त्यात मुंबईतील 20, पुणे 3, ठाणे 2, नागपूर आणि रायगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सर्व मृत 40 ते 60 पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयाचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 1 लाख 45 हजार 798 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 10 हजार 498 जण कोरोनाबाधित आहेत. या कोरोनाबाधितांपैकी 1 हजार 773 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

तर 459 जण मरण पावले आहेत. त्यामुळे सध्या 10 हजार रुग्णांची नोंद आहे. 

सध्या राज्यभरातील 42 लाख 11 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 1 लाख 68 हजार जणांना घरीच विलग ठेवण्यात आले आहे. तर 10 हजार 695 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

दिवसभरातील नवे रुग्ण - 583 
एकूण रुग्ण - 10 हजार 498 
मृत - 27 
एकूण मृत - 459 
बरे झालेले एकूण रुग्ण - 1 हजार 773


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So far so many patients in the state have been cured Read detailed