पुणे विद्यापिठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर कडक देखरेख 

Strict supervision of international students at Pune University
Strict supervision of international students at Pune University

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राहणारे आतंरराष्ट्रीय विद्यार्थी लाॅकडाऊनच्या काळात वसतीगृहातून बाहेर पडू नयेत, त्यांच्याकडून सामाजिक अतंराच्या नियमाचे पालन केले जावे यासाठी विद्यापीठाने कडक देखरेख ठेवली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
'कोरोना'मुळे सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली, त्यानंतर वसतीगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या १८ वसतीगृहातील १ हजार ७५० विद्यार्थी व १ हजार ५५० विद्यार्थीनींना वसतीगृह सोडून गावाकडे जावे लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राकडील माहिती नुसार विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आंतरराष्ट्रीय वसतीगृहात १२० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यापैकी ४० विद्यार्थीनी आहेत.

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...
देशात 'कोरोना'चे रुग्ण सापडण्यास सुरूवात झाल्यानंतर आतंरराष्ट्रीय केंद्रात विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या. लाॅकडाऊन झाल्यानंतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी वसतीगृह सोडून बाहेर पडू नये यासाठी काळजी घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी केली जाते. वसतीगृहात प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खोली व स्वयंपाक घर असल्याने ते स्वतःसाठीचे जेवण स्वतः बनवतात. त्यांना भाजी व किराणा वसतीगृहाच्या गेटजवळ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडून विद्यापीठाच्या परिसरात फिरण्यास किंवा विद्यापीठाच्या बाहेर जाण्यास बंधने घालण्यात आली आहेत. तसेच विद्यापीठाच्या आवारात राहणारे अधिकारी, प्राध्यापक कर्मचारी यांनाही विद्यापीठाच्या बाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. 

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत...

"आतंरराष्ट्रीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांकडून होम क्वारंटाइनचे पालन करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष आहे. त्यांना भाजी, किराणा आतमध्ये उपलब्ध होत आहे. ते कुठेही बाहेर फिरू शकत नाहीत. "
- डाॅ. विजय खरे, प्रमुख, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्र

मध्य रेल्वे मदतीला सरसावली; 10 दिवसांत 28 हजार मालगाड्या, 550 रेल्वे गाड्यांतून माल रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com