Coronavirus : खाकी वर्दीतील माणुसकीने तरुणी पोचली सुखरुप घरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

शहरात संचारबंदी लागू असतानाही एक तरुणी गुरुवारी अचानक सकाळ कार्यालयत आली. रडवेल्या आवाजात 'मला मदत पाहिजे, मला मदत करा', अशा शब्दात तिने कर्मचार्‍यांकडे मदत मागितली. कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनीही तिची विचारपूस करीत तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले.

पुणे - शहरात संचारबंदी लागू असतानाही एक तरुणी गुरुवारी अचानक सकाळ कार्यालयत आली. रडवेल्या आवाजात 'मला मदत पाहिजे, मला मदत करा', अशा शब्दात तिने कर्मचार्‍यांकडे मदत मागितली. कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनीही तिची विचारपूस करीत तिला तिच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात चार दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. मात्र, 20 ते 25 वयोगटातील एक तरुणी गुरुवारी सकाळी साडेनऊला 'सकाळ'च्या बुधवार पेठेतील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आली. तेथे उपस्थित असलेले सुरक्षारक्षक राहुल वाघ यांच्याकडे तिने मदत मागितली. रडवेला आवाज व अशक्तपणामुळे वाघ यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. मात्र ती असंबद्ध बोलू लागल्यामुळे अखेर त्यांनी 100 क्रमांकावरुन पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर 5 मिनिटांत दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीला विश्रामबाग पोलिस ठाण्यात नेले. तिथे फौजदार गीता पाटील यांनी तरुणीची प्रेमाने विचारपूस केली. त्यावेळी तिने तिचे सामान वानवडी पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वानवडी- पोलिसांमार्फत तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तिला घरी नेले.

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

संबंधित तरुणी एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होती. मात्र तिचे तिच्या भावाशी कौटुंबीक कारणावरुन भांडणे झाली होती. तरुणीच्या मनावर परिणाम झालेला आहे. त्याच अवस्थत ती घराबाहेर पडली होती. ती सकाळ कार्यालयात आल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तिला पोलिस ठाण्यात आणून तिची विचारपूस केली. त्यानंतर तिला कुटुंबाकडे पाठविले आहे.
- गीता पाटील, फौजदार, विश्रामबाग पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young girl arrives home safely by police