esakal | २४ तासांसाठी पबजी आहे बंद; काय आहे कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

PUBG is being closed from midnight of April 4 for 24 hours

जगातील टॉप मोबाइल गेम्सपैकी एक म्हणजे सध्या पबजीचे नाव आघाडीवर आहे. ४ एप्रिल मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ५ एप्रिल मध्यरात्री १२ पर्यंत पबजीचं शटडाऊन असणार आहे. म्हणजेच हा गेम २४ तासांसाठी पूर्णपणे बंद आहे.

२४ तासांसाठी पबजी आहे बंद; काय आहे कारण?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : सध्या पबजी नावाच्या मोबाईल गेमने तरुणाईला वेड लावलेले आहे. मात्र, पबजी खेळणाऱ्या सर्वांसाठी एक वाईट बातमी असून २४ तासांसाठी पबजी हा गेम बंद राहणार आहे. जगातील टॉप मोबाइल गेम्सपैकी एक म्हणजे सध्या पबजीचे नाव आघाडीवर आहे. ४ एप्रिल मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ५ एप्रिल मध्यरात्री १२ पर्यंत पबजीचं शटडाऊन असणार आहे. म्हणजेच हा गेम २४ तासांसाठी पूर्णपणे बंद आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पबजी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने युजर्सना नोटिफिकेशनद्वारे दिली आहे. इतका प्रसिद्ध गेम २४ तासांसाठी बंद ठेवण्यामागचं कारण आहे कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसशी लढा देताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पबजी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: तरुणाइला या गेमचं प्रचंड वेड आहे. इतकं की या गेमच्या वेडापायी खाणं-पिणं सोडल्याच्या, अगदी आत्महत्या केल्याच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. 

Coronavirus : पंतप्रधान मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद

जगभरातील सर्व्हर बंद करण्यात येणार असल्याने भारतातही लोकांना हा गेम २४ तासांसाठी खेळता येणार नाही. चीन, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवान येथेसुद्धा पबजी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पबजीवर बंदी करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी या गेमची एक वेगळी व्हर्जन उपलब्ध आहे.

loading image
go to top