coronavirus : जिल्हा परिषदासह ग्रामीण शाळाही 31 पर्यंत बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यातील नगरपालिका, महापालिका तसेच शहरी भागातील शाळा व महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील जिल्हा परिेषद शाळा, सरकारी व खासगी शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. त्याची अमंलबजावणी आज (ता.16) पासून करण्यात येणार आहे.दरम्या जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कामकाज करावे असे आदेश जारी केले आहेत. 

सार्वजनिक आरोग्य विभागाने 14 व 15 मार्च रोजी अध्यक्षादेश काढून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपायोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, सर्व नगरपंचायत व सरकारी खासगी शाळा, शैक्षणिक केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता ग्रामीण क्षेत्रातील सुध्दा शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद तसेच खासगी शाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र दहावी व बारावीच्या परिक्षा वेळापत्रकानुसार घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

शिक्षकांनी शाळेचे कामकाज करावे 
ेशासनाने ग्रामीण भागातील शाळा बंदचे आदेश दिले आहे. त्या दृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील पाटील आदेश जारी केले आहेत. त्यांनी ग्रामीण क्षेत्रातील सर्व शाळा महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यांचे आदेश जारी केले आहेत. तसेच दहावी व बारावीच्या परिक्षा वेळापत्रकानुसार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळा,महाविद्यालय बंद असले तरी मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे शाळेत उपस्थित राहून कामकाज करावे याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात तसेच त्याचा अनुपालन अहवालन सादर करावा असेही त्यानीं कळविले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Rural schools including Zilla Parishad closed up to 31