Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; रूग्णाची संख्या....

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर गेली असून, आतापर्यंत ३ बळी गेले आहेत.

मुंबई : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात आज कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. आरोग्य विभाग व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८९ वर गेली असून, आतापर्यंत ३ बळी गेले आहेत. त्यामुळे प्रशासनासह सर्वच अत्यावश्यक सेवा जोराने काम करत असून डॉक्टर, नर्स, सफाई कामगार यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. 

#WeCareForPune पुण्यात सन्नाटा

महाराष्ट्रात ८९ कोरोनाबाधित सापडले असून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना २४ तास निरिक्षणात ठेवले गेले आहे. तर राज्यात आतापर्यंत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून तिन्ही मृत्यू हे मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयातच झाले. राज्यभरात सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात असून ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 

Coronavirus : बापरे! देशातील कोरोनाच्या बळींची संख्या...

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईत नुकताच आणखी एकाचा मृत्यू झाला असून तो ५९ वर्षांचा होता. नुकतीच ही व्यक्ती फिलिपिन्सवरून आली होती व खासगी रूग्णालयात उपचार घेत होती. मुंबईतच तिसरा बळी गेल्याने शहरात भितीचे वातावरण आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dies in Maharashtra due to Corona and 89 cases of the same