Coronavirus : बापरे! देशातील कोरोनाच्या बळींची संख्या...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 मार्च 2020

देशात प्रथमच एकाच दिवसामध्ये तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबई, पाटणा आणि सुरत या तीन शहरांमध्ये रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ही सातवर गेली असून, देशभरातील बाधितांची संख्या ३४१ वर गेली आहे.

नवी दिल्ली : देशात प्रथमच एकाच दिवसामध्ये तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबई, पाटणा आणि सुरत या तीन शहरांमध्ये रुग्ण दगावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या ही सातवर गेली असून, देशभरातील बाधितांची संख्या ३४१ वर गेली आहे.

#WeCareForPune पुण्यात सन्नाटा

मुंबईत मरण पावलेल्या ६३ वर्षीय रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयरोगाचा आजार होता. बिहारमध्ये मरण पावलेल्या रुग्णाचे वय ३८ वर्षे होते. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच कतारहून भारतामध्ये आला होता. गुजरातमधील सुरत शहरामध्ये विषाणू बाधा झाल्याने ६७ वर्षांच्या वृद्धाला प्राण गमवावे लागले. या वृद्धालाही दम्याचा आजार होता तसेच त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास 395 झाला असून, महाराष्ट्रातील संख्या ७४ पोहोचली आहे. सर्व राज्यात खबरदारी घेतली जात आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीनुसार जनता कर्फ्यू पाळला गेला. दिवसभर कोणीही घराबाहेर पडले नाही. या उत्स्फूर्त कर्फ्यूनंतर महाराष्ट्र ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 7 death in India because of Coronavirus