esakal | देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 83; वाचा कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus india update information marathi Maharashtra has maximum patients

विषाणूची लागण झालेल्यांची संख्या केरळमध्ये १९ असून त्यात गेल्या महिन्यात रुग्णालयातून घरी सोडलेल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 83; वाचा कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या शनिवारी ८३ वर पोचली. या विषाणूमुळे दिल्ली व कर्नाटकात मृत्यू झालेल्या दोघांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. कर्नाटकमधील कलबुर्गी येथील ७६ वर्षांच्या वृद्धाचा गुरुवारी (ता. १२) आणि दिल्लीतील ६८ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा काल रात्री कोरानाची लागण होऊन मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा विदेशात जाऊन आला होता, तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिला मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचाही आजार होता, त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिल्लीत आत्तापर्यंत सात, तर उत्तर प्रदेशमध्ये ११ बाधित रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये सहा, महाराष्ट्रात १४ आणि लडाखमध्ये तीन रुग्ण आहेत. राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू, जम्मू-काश्‍मीर, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या केरळमध्ये १९ असून त्यात गेल्या महिन्यात रुग्णालयातून घरी सोडलेल्या तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यांना ‘फ्लू’सदृ‍श आजाराचे निदान झाले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडले होते. देशात ८३ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यात १७ विदेशी नागरिक असून त्यापैकी १६ इटलीचे व एक कॅनडाचा पर्यटक आहे.

आणखी वाचा - महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढला, वाचा सविस्तर 

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिकांनी घाबरून नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या विषाणूची लागण सामूहिक पातळीवर झाली नसून विविध राज्यांमधून स्थानिक पातळीवर बाधित रुग्ण आढळले असल्याने सध्या तरी भारतात आरोग्य आणीबाणीची स्थिती नाही, असे मंत्रालयाने जाहीर केले आहे. ८३ बाधितांच्या संपर्कात चार हजार लोक आले असून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. देशभरात ४२ हजार नागरिकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सामूहिक पाळत, विलगीकरण, स्वतंत्र कक्ष, वैयक्तिक सुरक्षा उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ, शीघ्र कृती दल अशी आवश्‍यक यंत्रणा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तयार ठेवली असल्याचे मंत्रालयाने सांगितले. 

आणखी वाचा -  अमेरिकेत पसरतोय करोना, ऍपलचा मोठा निर्णय

गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिल मलिक यांनी दिलेली माहिती  

 • भारत- बांगलादेशमधील बस व रेल्वे सेवा १५ एप्रिलपर्यंत स्थगित 
 • भारत- नेपाळमधील सीमेवरील चार ठाणी सुरू 
 • नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना विनाव्हिसा प्रवेशावर निर्बंध नाही 
 • कर्तारपूर कॉरिडॉर बंद ठेवण्याचा विचार 

भारतात कोरोना व्हायरस (१४ मार्च २०२० रोजी सायंकाळपर्यंतची स्थिती)  

 • एकूण बाधित रुग्ण - ८४ 
 • बरे झालेले - १० 
 • मृत्यू - २ 
 • विमानतळांवर प्रवाशांची तपासणी - १२ लाख  २९ हजार ३६३ 
 • जम्मू-काश्‍मीर -  २ 
 • लडाख - ३ 
 • पंजाब - १ 
 • दिल्ली - ७ 
 • हरियाना - १४ 
 • राजस्थान - ३ 
 • महाराष्ट्र  २६ 
 • कर्नाटक - ६ 
 • केरळ - १९ 
 • तमिळनाडू - १ 
 • आंध्र प्रदेश - १ 
 • तेलंगण - १ 
 • उत्तर प्रदेश - १२ 

विदेशी नागरिक  

 • हरियाना - १४ 
 • राजस्थान - २ 
 • उत्तर प्रदेश - १ 

(स्त्रोत - आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय) केबीके इन्फोग्राफिक्स 

loading image