अमेरिकेत पसरतोय कोरोना; ऍपलने घेतला मोठा निर्णय, ट्रम्प चाचणीसाठी तयार

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 मार्च 2020

कोरोना विषाणूची कोणतेही लक्षणे दिसत नसली तरी मी संसर्ग झाला का याची तपासणी करू शकेन, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूयॉर्क Coronavirsu:चीनमधील कोरोना व्हायरसची तीव्रता कमी होत असताना, आता अमेरिकेत कोरोना व्हायरसचा फैलाव होताना दिसत आहे. देशातील 49 राज्यांमध्ये कोरोना पसरला असून, मॅनहॅटन शहरात एका 82 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. कोरोनामुळं चीन वगळता जगभरातील इतर ठिकाणी स्टोअर्स बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे ऍपल कंपनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेने कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली असून, लवकरच याबाबतचे विधेयक मंजूर करणार असल्याचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ट्रम्प तपासणी करणार? 
वॉशिंग्टन :  कोरोना विषाणूची कोणतेही लक्षणे दिसत नसली तरी मी संसर्ग झाला का याची तपासणी करू शकेन, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. मी तपासणी करणारच नाही, असे मी म्हणणार नाही, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. ट्रम्प व ब्राझीलच्या एका अधिकाऱ्याची भेट गेल्या आठवड्यात झाली होती. संबंधित अधिकाऱ्याला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर ट्रम्प स्वतःची चाचणी का करून घेत नाही, असा सवाल ‘व्हाईट हाउसमधील पत्रकार परिषदेत काल विचारण्यात आला. त्या वेळी त्यांनी पुढील काळात चाचणी करून घेण्याची शक्यता वर्तविली. 

आणखी वाचा - विश्वास बसणार नाही, चीनमधील वुहान शहर कोरोना मुक्त

आणखी वाचा  - महाराष्ट्रात कोरोना वाढला, या शहरात वाढली संख्या

जगभरातील स्थिती 

  • कोरोनाचे निदान एका तासात करण्यासाठी अमेरिका नवी चाचणी विकसित करणार. यासाठी दोन कंपन्यांना १३ लाख डॉलरचा निधी 
  • व्हेनेझुएलात प्रथमच दोन रुग्ण आढळले. देशात प्राथमिक उपचारांचा अभाव 
  • सौदी अरेबियात आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित 
  • इराणमध्ये ५०० बळी व ११ हजार बाधित रुग्ण असल्याचा दावा 
  • साथीशी लढा देण्याचा सशस्त्र दलांना इराणचे मुख्य नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा आदेश 
  • पुढील दहा दिवस सायबरस्पेस, फोनवरून संपूर्ण देशाचे नियंत्रण 
  • नमध्ये १५ दिवसांसाठी अतिदक्षतेचा इशारा 
  • स्पेनच्या अध्यक्षांच्या माहितीनुसार बळींची संख्या १२० वर तर ४,२०० बाधित रुग्ण 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus us update affected 49 states apple will close their stores