विदर्भाकडून राजस्थानचा धुव्वा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

नागपूर : कर्णधार भारती फुलमाळी, कांचन नागवानी व मीनल बोडखेच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विदर्भाने चौथ्या साखळी सामन्यात यजमान राजस्थानचा 85 धावांनी धुव्वा उडवून 23 वर्षांखालील मुलींच्या मध्य विभाग एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.

जयपूर येथील आरसीए अकादमीच्या मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाने 50 षटकांत 5 बाद 205 धावा काढल्या. भारतीने चार चौकार व दोन षटकारांसह 63 चेंडूंत 57 आणि कांचनने 8 चौकारांसह 35 चेंडूंत नाबाद 47 धावा काढल्या. सलामीवीर अंकिता भोंगाडेने 33 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्यरात विदर्भाच्या अचूक माऱ्यापुढे राजस्थानचा डाव 120 धावांतच आटोपला. मीनलने 16 धावांत तीन आणि नूपुर कोहळेने दोन गडी बाद करून विदर्भाच्या विजयास हातभार लावला. चार सामन्यांत आठ गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा शेवटचा साखळी सामना गुरुवारी उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ : 50 षटकांत 5 बाद 205 (भारती फुलमाळी 57, कांचन नागवानी नाबाद 47, अंकिता भोंगाडे 33, शिवानी धरणे 22, वैष्णवी खंडकर 10, पी. चौधरी 2-37, एस. सिद्धू 1-36).
राजस्थान : 49.1 षटकांत सर्वबाद 120 (ए.गर्ग 20, एस. सिद्धू 17, पी. चौधरी 14, एस. कुमावत 12, मीनल बोडखे 3-16, नूपुर कोहळे 2-20, कांचन नागवानी 1-16, वैष्णवी खंडकर 1-1).

Web Title: vidarbha defeats rajasthan