अश्‍विन भडकतो आणि विराट शांत राहतो तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई ः इंग्लंडचा अखेरचा फलंदाज जेम्स अँडरसन फलंदाजीस आला, तेव्हा कोणत्याही क्षणी भारताचा विजय होणार होता; पण नेमके त्याच वेळी मैदानावर काहीसे तणावाचे वातावरण झाले. एरवी अँग्री यंग मॅन विराट कोहली अशा प्रकारात नेहमी पुढे असतो; पण या वेळी अश्‍विनच संतापला होता आणि विराट शांत राहून समजूत काढत होता. हा प्रसंग घडण्यास अँडरसनचे वक्तव्य कारणीभूत होते.

चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटच्या द्विशतकी खेळीबाबत विचारण्यात आले होते. त्यावर अँडरसन म्हणाला, येथील खेळपट्ट्या फलंदाजीस चांगल्या असल्यामुळे कदाचित विराटचे फलंदाजीतले दोष झाकले जात असतील. (इंग्लंड दौऱ्यात अँडरसनने विराटला उजव्या यष्टींबाहेरील चेंडूवर सातत्याने बाद केले होते). आपल्या कर्णधारावर केलेली टीका अश्‍विनला सहन झाली नसावी आणि अँडरसन मैदानात येताच त्याने जाब विचारला असावा. याबाबत विराटने हसत हसत सांगितले, या वेळी मी शांत होतो. मुळात अश्‍विन कशामुळे भडकला, हे मला समजत नव्हते, मी हसत होतो; पण अश्‍विनचा राग दिसून येताच मी संयमाची भूमिका घेतली.

Web Title: ashwin raged and virat keeps mum