क्रिकेटपटू करुण नायर थोडक्यात बचावला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

श्री पार्थसारखी मंदिरात सुरु असलेल्या वल्ला सद्या या उत्सावानिमित्त करुण नायर याठिकाणी जात होता. त्याच्यासह बोटीतून आणखी 100 जण प्रवास करत होते.

कोची - केरळमधील पंपा नदीतून प्रवास करताना बोट बुडाल्याने भारतीय क्रिकेट करुण नायर थोडक्यात बचावला आहे. या बोटीतील दोघे जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री पार्थसारखी मंदिरात सुरु असलेल्या वल्ला सद्या या उत्सावानिमित्त करुण नायर याठिकाणी जात होता. त्याच्यासह बोटीतून आणखी 100 जण प्रवास करत होते. पण, त्यांची बोट अचानक उलटली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. बोट बुडाल्यानंतर काही क्षणांतच बचावासाठी बोट त्याठिकाणी आली आणि प्रवाशांना वाचविण्यात आले.

या बोटीतील अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत. बाकी नागरिकांना वाचविण्यात यश आल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. 24 वर्षीय नायर हा कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळतो. नुकतेच झिंबाब्वे दौऱ्यादरम्यान त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.

Web Title: Indian cricketer Karun Nair rescued as boat capsizes

टॅग्स