esakal | VIDEO : व्वाह!!! यॉर्कर टाकून चिमुरड्याने तोडले मिडल स्टम्प; हा तर छोटा जसप्रित बुमराह
sakal

बोलून बातमी शोधा

little boy balling

या मुलाने आपल्या शानदार बॉलिंगने चक्क मिडल स्टंप तोडल्याचं दिसून येत आहे.

VIDEO : व्वाह!!! यॉर्कर टाकून चिमुरड्याने तोडले मिडल स्टम्प; हा तर छोटा जसप्रित बुमराह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : टीम इंडियाचे शानदार बॉलर आणि यॉर्कर किंग समजले जाणारे जसप्रीत बुमराह यांची बॉलिंग ऍक्शन हटके मानली जाते. त्यांच्या या बॉलिंगची कॉपी अनेक जण करताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात त्यांच्या या बॉलिंग ऍक्शनची कॉपी करण्यात आली आहे. लहान मुले देखील त्यांच्यासारखीच बॉलिंग करु इच्छित आहेत.

हेही वाचा - जर्मनीत कोरोनाची दुसरी लाट; कडक निर्बंधांसह लॉकडाऊनचा कालावधी वाढला

स्वत: बुमराह यांनी अशा लहानशा चिमुरड्यांचे बॉलिंग करतानाचे व्हिडीओ याआधी ट्विट केले आहेत. यावेळी आयपीएस ऑफिसर दीपांशु काबरा यांनी एका चिमुरड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हा चिमुरडा जसप्रित बुमराहप्रमाणेच बॉलिंग करताना दिसत आहे. आणि या मुलाने चक्क स्टंप तोडल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आयपीएस दीपांशु यांनी जबरदस्त रिऍक्शन दिले आहेत. 

या व्हिडीओत दिसत आहे की हा चिमुरडा घराच्या गार्डनमध्ये बॉलिंगची प्रॅक्टीस करतो आहे. त्याच्यासमोर एक स्टम्प लावण्यात आला आहे. हा चिमुरडा जसप्रित बुमराहच्या बॉलिंग स्टाईलप्रमाणेच धावत येतो आणि यॉर्कर बॉल टाकतो. ज्याप्रकारे यॉर्कर बॉलने स्टम्प बोल्ड होतो तसेच या व्हिडीओत या मुलाने केवळ एकाच मधल्या स्टम्पला क्लिन बोल्ड केलं आहे. यामध्ये हा स्टम्प तुटलेला दिसून येतो आहे. 

हेही वाचा - नव्या वर्षात ट्विटर पुन्हा देणार ब्लू टिक; तब्बल तीन वर्षानंतर व्हेरिफिकेशन प्रोग्राम
आयपीएस ऑफिसर दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, भेटा बेबी बुमराहला! चिमुरड्या, देव तुझं भलं करो! सोबतच त्यांनी जसप्रित बुमराह आणि मुंबई इंडियन्सला टॅग केलं आहे. त्यांनी या व्हिडीओला 26 नोव्हेंबर रोजी शेअर केलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तीन हजारहून अधिक व्ह्यूज झाले आहेत. सोबतच जवळपास 500 हून अधिक लाईक्स आणि कित्येक रि-ट्विट्स देखील मिळाले आहेत. ट्विटरवर लोकांनी या मुलाचे कौतुक करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

loading image