नव्या वर्षात ट्विटर पुन्हा देणार ब्लू टिक; तब्बल तीन वर्षानंतर व्हेरिफिकेशन प्रोग्राम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

ट्विटरने हा निर्णय मागच्या दोन वर्षांपासून युझर्सकडून खूप टीका झेलल्यानंतर घेतला आहे.

नवी दिल्ली : ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावासमोर ब्लू टिक बॅज असणं कुणाला नाही आवडत? आपलं अकाऊंट व्हेरिफायड असणं ही खरं तर अभिमानाचीच बाब ठरेल. मात्र, ट्विटर कडून हा ब्लू टिक मिळवणे हे तितकंही सहजसोपं निश्चितच नाहीये. तसेच दरम्यानच्या काळात ट्विटरने व्हेरिफिकेशनची ही प्रक्रियाच थांबवली होती. मात्र, आता आनंदाची बातमी अशी आहे की, भारतात ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम पुन्हा एकदा सुरु होत आहे. 

ट्विटरने हा निर्णय मागच्या दोन वर्षांपासून युझर्सकडून खूप टीका झेलल्यानंतर घेतला आहे. कंपनीने याबाबतची माहिती आपल्या एका ब्लॉग पोस्टमधून दिली आहे. ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रोग्राम नव्या वर्षांत सुरु होऊ शकतो. तर याआधीच कंपनीने फिडबॅक मागितला आहे ज्याची सुरवात झाली आहे. ही प्रक्रिया 8 डिसेबंर 2020 ला समाप्त होईल. 

हेही वाचा - सावधान! WhatsApp OTP Scam मधून हॅकर्स साधतायत निशाणा

ट्विटरने 2017 मध्ये पब्लिक व्हेरिफिकेशन बंद केलं होतं. आता तब्बल तीन वर्षांनंतर ट्विटर कंपनी पुन्हा एकदा अकाऊंट व्हेरिफिकेशन सुरु करणार आहे. यादरम्यान अनेक राजकीय लोक, पत्रकार, अभिनेते,  सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रातील लोकांचे अकाऊंट व्हेरिफाय झाले आहेत. 

नव्या वर्षाच्या सुरवातीच्या टप्प्यातच सहा प्रकारच्या अकाऊंटचे व्हेरिफइकेशन होईल. यामध्ये सरकारी कंपन्या, ब्रँड्स, नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन, न्यूज, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, ऑर्गनायझर आणि दुसऱ्या प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे. ट्विटरने स्पष्ट केलंय की, त्या अकाऊंट्सना व्हेरिफाय केले जाईल ज्यांचे फोलोवर्स खूप जास्त आहेत. 

हेही वाचा - एकदा चार्ज केल्यावर सर्वाधिक धावणारी इलेक्ट्रिक स्कूटर; बजाज चेतकला देणार टक्कर

कंपनीने म्हटलंय की जे नियमांचे उल्लंघन करतात किंवा वारंवार नियमांचा भंग करतात त्यांचे व्हेरिफिकेशन काढून घेतले जाऊ शकते. द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट,  हिंसात्मक पोस्ट आणि देशाच्या अखंडतेविरोधात पोस्ट करणाऱ्यांते ब्लू टिक बॅज काढून घेतले जाईल. तसेच ही प्रक्रिया ऑटेमॅटीक पद्धतीने होणार नसल्याचंही ट्विटरने स्पष्ट केलंय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter to relaunch account verification process in early 2021