U-19 WC : हिरोची कहाणी! रशीदच्या क्रिकेटपायी वडिलांनी गमावली होती नोकरी

U-19 WC : हिरोची कहाणी! रशीदच्या क्रिकेटपायी वडिलांनी गमावली होती नोकरी
Summary

सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्यानं अर्धशतक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (U-19 Cricket World Cup) भारताने पाचव्यांदा करंडक उंचावला आहे. अंतिम सामन्यात उप कर्णधार शेख रशिद (Rasheed Shekh) याने अर्धशतकी खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी साकारली आहे. सेमीफायलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०८ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रशिदला त्याच्या क्रिकेट प्रेमासाठी दररोज ५० किमी प्रवास करायला लागायचा. गेल्या दोन वर्षांपासून जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटात त्यालाही संसर्ग झाला होता. मात्र, या सगळ्यावर त्याने जिद्दीच्या जोरावर मात केली.

रशिद गुंटुरमध्ये राहतो आणि त्याच्या घरापासून ५० किमी दूर मंगलगिरी इथं त्याची क्रिकेट अकादमी आहे. तरीही त्यानं कधीच सरावाला दांडी मारली नाही. त्याचे वडील शेख बालीशा त्याला गाडीवरून दररोज ५० किमी दूर असलेल्या क्रिकेट अकादमीत घेऊन जायचे. मुलाला क्रिकेटचे धडे गिरवता यावेत यासाठी रशिदचे वडील शेख बालीशा यांनी कोणतीही कमी भासू दिली नाही. दररोज ५० किमी प्रवासामुळे कामावर जायला वेळ व्हायचा. यामुळे त्यांना त्यांची नोकरीसुद्धा गमवावी लागली. शेख बालिशा हे हैदराबादमधील बँकांसाठी रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होते.

U-19 WC : हिरोची कहाणी! रशीदच्या क्रिकेटपायी वडिलांनी गमावली होती नोकरी
VIDEO : धोनीचा 'बाणा' दिनेशचा फिनिशिंग सिक्सर अन् खास योगायोग

बालिशा यांननी मुलाच्या क्रिकेटबद्दल बोलताना म्हटलं होतं की, गुंटुरमध्ये त्यांच्या एका मित्राने रशिदला क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. त्यानेच मुलगा क्रिकेटमध्ये करिअर करू शकतो असं सांगितलं होतं. दुर्दैवाने त्याला भाडं देण्याशिवाय इतर गोष्टी पुरवण्यासाठी आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हतो. त्यामुळे २०१२ मध्ये आम्ही गुंटुरला परतलो.

गुंटुरमध्ये स्थानिक क्रिकेट अकादमीमध्ये जास्त फी होती. त्यामुळे जवळच्याच एका मैदानावर त्याला सरावासाठी वडील रशिदला घेऊन जात असत. काही काळाने रशिदच्या वडिलांना एका ऑटोमोबाइल कंपननीत नोकरी मिळाली. दरम्यान, दररोज ५० किमीचा प्रवास केल्यामुळे बालिशा यांना कामावर जायला उशीर व्हायचा. त्यांची ही अडचण अकादमीतल्या प्रशिक्षकांनी रशिदला अकादमीतच राहण्यासाठी सुचवलं.

U-19 WC : हिरोची कहाणी! रशीदच्या क्रिकेटपायी वडिलांनी गमावली होती नोकरी
U19 World Cup: कोण आहे राज बावा?; ज्यानं फायनलमध्ये केली हवा!

रशिदची निवड आंध्र प्रदेशच्या अंडर-१४ संघात झाली. त्यानंतर २०१८-१९ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीत त्याने ६७४ धावा काढल्या. यात तीन शतकांचाही समावेश होता. गेल्या वर्षी विनू मांकड ट्रॉफीत त्यानं ६ सामन्यात ३७६ धावा केल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंडर-१९ आशिया कपसाठी त्याची निवड झाली. त्यानं सेमीफायनलमध्ये बांगलादेशविरुद्ध नाबाद ९० धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्याआधी रशिदला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आपलं वर्ल्ड कपमधलं करिअर संपलं की काय अशी भीतीही त्याला वाटली होती. आपण बाद फेरी संपेपर्यंत बरे होऊ की नाही याबाबत त्याला शंका होती. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापर्यंत तो बरा झाला. त्यानंतरच्या सामन्यात त्यानं चमकदार अशी कामगिरी केली. सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्यानं अर्धशतक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com