U19 World Cup: कोण आहे राज बावा?; ज्यानं फायनलमध्ये केली हवा!

U19 World Cup 2022: Who is Raj Bawa? Know About Raj Bawa
U19 World Cup 2022: Who is Raj Bawa? Know About Raj BawaSakal

Raj Bawa Profile and Biography: अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात (ICC Under 19 World Cup 2022 Final) राज बावानं (Raj Bawa) नं इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. त्यानंतर फलंदाजी करताना ३५ धावा केल्या. त्याने गोलंदाजी करताना इंग्लंडच्या निम्म्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. फायनल आधी साखळी सामन्यातही त्याने युगांडा विरुद्ध 108 चेंडूत 162 धावांची नाबाद खेळी केली होती. ज्यात 14 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचणाऱ्या राज बावानं फायनलमध्ये गोलंदाजीतही कमाल दाखवली. युगांडा विरुद्धच्या सामन्यात त्याने शिखर धवनचा (Shikhar Dhawan) विक्रम मोडीत काढला होता. धवनने 2004 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 155 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. राज बावाला खेळाचा वारसा लाभला आहे. त्याचे आजोबा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर वडीलांनी युवराजन सिंहसह दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्संना कोचिंग दिले आहे. (Who is Raj Bawa?)

राज बावाचे आजोबा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट

12 नोव्हेंबर 2002 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या राज अंगद बावा (Raj Angad Bawa) याचे आजोबा त्रिलोचक बावा (Tarlochan Bawa) हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. 1948 मध्ये त्यांनी लंडन ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय हॉकी टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. राज बावा 5 वर्षांचा असताना त्याच्या आजोबांचे निधन झाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील फायनल सामन्याचे अपडेट्स एका क्लिकवर

राज बावाचे वडिलांनी हरियाणाकडून केलंय हॉकीचे प्रतिनिधीत्व (Know About Raj Bawa)

राजचे वडील सुखविंदर बावा (Sukhwinder Bawa) हरियाणा ज्यूनियअर हॉकी संघाचे सदस्य राहिले आहेत. 1988 मध्ये अंडर-19 क्रिकेट कॅम्पमध्येही त्यांचे सिलेक्शन झाले होते. पण दुखापतीमुळे त्यांनी 22 व्या वर्षीच कोचिंगच्या दिशेनं पाउल टाकले. त्यांनी युवराज सिंगसह अन्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्संना ट्रेनिंग दिले आहे.

राजला व्हायच होतं अभिनेता

राज बावा डान्सचा छंद आहे. अभिनेता होण्याची त्याची इच्छा होती. वडिलांसोबत क्रिकेट पाहायला गेल्यानंतर त्याचा इरादा बदलला आणि त्याची पाऊलं क्रिकेटच्या मैदानाकडे वळली.

U19 World Cup 2022: Who is Raj Bawa? Know About Raj Bawa
VIDEO: घडलं असं काही की बेल्स अन् बेन कटिंगच्या बायकोचा चेहरा देखील पडला!

युवराज सिंगला आदर्श मानतो राज बावा

राइट आर्म फास्ट मीडियम बॉलर राज बावा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतो. यामागे केवळ आणि केवळ युवराज सिंग (Yuvraj Singh) आहे. युवराज सिंगने कधी काळी राजच्या वडिलांकडून ट्रेनिंग घेतले आहे. युवराज सिंगला जवळून पाहिल्या मुळेच ते डावखुऱ्या हाताने फलंदाजी करायला लागला.

राज बावा का लकी नंबर ’12’

राज बावा आणि युवराज सिंग यांच्यात 12 हा नंबर कॉमन आहे. युवीचा बर्थडे 12 डिसेंबर आहे. तर राज 12 नोव्हेंबरला जन्मला आहे. युवराजप्रमाणेच तो 12 नंबरची जर्सी घालतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com