इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाची गोडी अविट- विराट

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई : इंग्लंड हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्याकडे सरस खेळाडू आहे, त्यामुळे वर्षभरात मिळवलेल्या इतर मालिका विजयांपैकी या मालिका विजयाची गोडी अविट आहे, असे निर्भेळ मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

मुंबई : इंग्लंड हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्याकडे सरस खेळाडू आहे, त्यामुळे वर्षभरात मिळवलेल्या इतर मालिका विजयांपैकी या मालिका विजयाची गोडी अविट आहे, असे निर्भेळ मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींच्या मालिकेत 3-0 विजयी आघाडी घेतल्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहावी मालिका जिंकली. यातील कोणते यश अधिक सुखावते, यावर विराटने इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेचा उल्लेख केला. इंग्लंडला गेल्या मालिकांमध्ये हरवले नव्हते. मायदेशातीलही सलग दोन मालिका गमावल्या होत्या. त्यामुळे उट्टे काढले का, असे विचारले असता विराट म्हणतो, खरं तर आम्ही असा विचार करून मैदानात उतरत नसतो. आम्ही केवळ सामन्याचाच विचार करतो; पण ही मालिका आम्ही मुंबईतच जिंकण्याचा निर्धार केला होता.
इंग्लंडकडे चांगले खेळाडू आहेत; तसेच त्यांनी भारतात यापूर्वी यश संपादले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना या वेळी चुका करण्यास भाग पाडले. या सामन्यात आम्ही 231 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंड खेळाडूंची देहबोली पाहिली आणि सामन्यासह मालिका लवकरात लवकर फत्ते करण्यासाठी अधिक आक्रमक खेळ केला, असे विराटने सांगितले.

या सामन्यापूर्वी मी काहीसा नव्हर्स होतो, त्यातच इंग्लडच्या 400 धावांसमोर आमच्या मधल्या फळीची घसरगुंडी उडाली होती; पण लगेचच आम्ही सावरलो. तासा-दोन तासांत चित्र बदलले. मुरली विजयला जसे श्रेय जाते; तसेच जयंत यादवही शाबासकीस पात्र आहे. संघाची गरज ओळखून खेळ कसा करायचा, हे त्याला सांगावे लागत नाही. हे तो चांगलेच जाणतो, विराट म्हणत होता.
पहिल्या डावात 50 धावांची आघाडी मिळाली, तरी चांगले असेल असा विचार आम्ही केला; पण जयंतने सुरेख साथ दिली आणि द्विशतकी आघाडी मिळवल्यावर विजयाची खात्री झाली. या मालिकेत तळाच्या फलंदाजांचे योगदान चांगलेच निर्णायक ठरले आहे, असे विराटने आवर्जून सांगितले.

Web Title: virat hails the victory