Murder: अल्पवयीन मुलाने केला ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलं

Nanded Murder: पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढून उच्चस्तरीय तपासणीसाठी बिलोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.
Murder: अल्पवयीन मुलाने केला ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलं

Biloli Crime: तालुक्यातील आरळी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गावातील ४२ वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना ४८ तासांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोलीपासून उत्तरेला सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आरळी येथील सतरा वर्षीय तरुण गौतम विठ्ठल सोनकांबळे (वय ४२) यांना ७ जुलैला रात्री नऊच्या दरम्यान ‘आपण बिलोलीला जाऊत चल’ असे सांगून घराबाहेर काढले. त्यानंतर सोनकांबळे यांना दारू पिऊ घालत मारहाण करत खून केला. यानंतर त्यांचे प्रेत बिलोली शहरालगतच्या मालगुजारी तलावात फेकून दिले.

Murder: अल्पवयीन मुलाने केला ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलं
Murder: वसई विरार महिलांसाठी सुरक्षित आहे का? केवळ 15 दिवसात इतक्या महिलांची झाली हत्या

दरम्यान, मुलगा मृताची दुचाकी गावात फिरत होता. यावर सोनकांबळे यांच्या पत्नीला संशय आला. आपला पती घरी आला नाही म्हणून तिने शोधाशोध सुरू केली. तसेच या घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील व सरपंचांना दिली. संशयित आरोपीने गौतम यसंना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे सांगितले. मात्र, प्रेत कोणत्या ठिकाणी आहे हे सांगण्यास नकार दिला.

यावर मृताच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला व प्रेत शोधून काढण्यासाठी दबाव आणला. बिलोली पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता सदर प्रेत बिलोली शेजारील तलावात फेकल्याचे त्याने सांगितले. मंगळवारी (ता. ९) पहाटे पाचच्या सुमारास मयताचे प्रेत तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढून उच्चस्तरीय तपासणीसाठी बिलोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.

Murder: अल्पवयीन मुलाने केला ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलं
Kalyan Murder: पोलिसांची मोठी कारवाई, 24 तासाच्या आत 'त्या' दोघांना केली अटक

याप्रकरणी मयताची पत्नी धम्मशिला गौतम सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस ठाण्यात मंगळवारी नवीन कलमानुसारखुनाचा तसेच ॲट्रॉसिटी करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील करीत आहेत.

Murder: अल्पवयीन मुलाने केला ४२ वर्षीय व्यक्तीचा खून, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलं
Salman Khan Murder Planning: सिद्धू मूसेवालाप्रमाणे सलमान खानला..., लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या PAK कनेक्शनच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com