Nagpur News: कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा खून; अंबाझरीतील पहाटेची घटना ; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Nagpur Youth tragedy in Early Morning Scuffle at Ambazari: नागपूर अंबाझरीत कॉफी हाऊस चौकाजवळ २० वर्षीय तुषार चुटेचा स्कुटर वादातून चाकूने खून झाला. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतले.
Nagpur News: कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाचा खून; अंबाझरीतील पहाटेची घटना ; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
Updated on

नागपूर: कॉफी हाऊस चौकात सोमवारी (ता.११) पहाटे तीन वाजताच्या सुमारास स्कुटर चालविताना झालेल्या किरकोळ वादातून २० वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तुषार सुधीर चुटे (वय २०, रा. स्मृतीनगर, हुडकेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मिळेल ते काम करतो. त्याचे वडील सुधीर चुटे यांच्या पायाला लागले असल्याने ते घरीच असतात. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही अल्पवयीन आरोपी बारावीत शिकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com