Mumbai Crime: वृद्धाला आठ कोटींना लुबाडले, दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटक; गुन्हा दाखल
Cyber Crime News: सायबर भामट्यांनी एका वृद्धाला आठ कोटींना लुबाडल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : सायबर भामट्यांनी अंधेरीतील वृद्ध व्यावसायिकास दोन आठवडे आभासी अटकेत ठेवून तब्बल आठ कोटी रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.