Latest Marathi News | Dhule Crime News : नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young boy  death body found in river

Dhule Crime News : नदीत उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह हाती


धुळे : शहरातील गरुड कॉलनीतील २८ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. २८) सकाळी पावणेदहाच्या सुमारास श्री कालिकामाता मंदिराजवळील पांझरा नदीवरील फरशी पुलावरून उडी घेतली होती. चोवीस तासातील शोध कार्यानंतर त्याचा मृतदेह गुरवारी दुपारी हाती लागला.

मोठ्या पुलालगत पांझरा नदी पात्रात मृतदेह सापडला. रोहित प्रदीप बोरसे (वय २८) असे त्याचे नाव आहे. जयहिंद मंगल कार्यालय परिसरातील गरुड कॉलनीत विजय पाटील (प्लॉट क्रमांक ३०) यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याकडे रोहित शिक्षणासाठी वास्तव्यास होता.(dead body found of boy who jump into river dhule News)

हेही वाचा: Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक !

त्याने नदीत उडी घेतल्यानंतर काही पोहणाऱ्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पांझरा प्रवाहित असल्याने रोहित गाळात फसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळेच फरशी पुलापासून काही अंतरावरील मोठ्या पुलालगत त्याचा मृतदेह आढळला. तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला.

हेही वाचा: Jalgaon : पोलिस ठाण्याबाहेरच महिलेचा विषप्राशनाने मृत्यू

टॅग्स :DhulecrimedeathRiver