
Nilesh Rathod Producer Arrested for 10 Crore Fraud Promising Government Jobs
Esakal
बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाकडून ५ ते १५ लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळल्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. त्याने राज्यातील ६० पेक्षा जास्त जणांना गंडा घातला असून तब्बल १० कोटींची फसवणूक केलीय. आरोपीचं नाव नीलेश राठोड असून तो अकोल्याचा आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिल्लीतून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला कोर्टानं १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.