

Ganesh Kale Case Pune CCTV Video Captures Terrifying Street Attack
Esakal
माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची शनिवारी गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेनं पुण्यात खळबळ उडालीय. गोळ्या झाडल्यानंतर डोक्यावर कोयत्यानं वारही करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर खडीमशीन चौक-येवलेवाडी दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गणेश काळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा तो भाऊ आहे. या हत्येचा व्हिडीओसुद्धा आता व्हायरल झाला आहे.