

UPSC Student Murder: Hard Disk Reveals 15 Women’s Obscene Videos
Esakal
दिल्लीत गांधी विहार इथं युपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे होते आहेत. रामकेश मीना याचा घरातील सिलिंडर स्फोटात मृत्यू झाला असं भासवण्यात आलं होतं. त्याची २१ वर्षीय लिव्ह इन पार्टनर अमृता चौधरी हिनं एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीनं त्याची हत्या केली होती. या प्रकरणी अमृताला अटक करण्यात आलीय. आता रामकेश आणि अमृता यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामकेशकडे असलेल्या हार्ड डिस्कमध्ये १५ पेक्षा जास्त तरुणींचे अश्लील व्हिडीओ आढळून आले आहेत. तर मुलीचे गुण चांगले नसल्याचं सांगत अमृताच्या कुटुंबियांनी तिच्याशी असलेले संबंध वर्षभरापूर्वीच तोडले होते. याबाबत पेपरमधून जाहीर केलं होतं.