पाच दिवसांत आरोपपत्र अन् १६ दिवशी थेट निकाल! सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Life imprisonment in 16 days verdict : या प्रकरणी न्यायालयाने अवघ्या १६ दिवसांत निकाल देत आरोपी अशोक निषाद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्यावर ५५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
Life imprisonment in 16 days verdict

Life imprisonment in 16 days verdict

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील पीपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांच्या निरागस मुलीवर २१ फेब्रुवारी रोजी अमानुष अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने अवघ्या १६ दिवसांत निकाल देत आरोपी अशोक निषाद याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याच्यावर ५५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एकीकडे न्यायालयातील खटले वर्षानुवर्ष चालत असताना अवघ्या १६ दिवसांत निकाल दिल्याने याप्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com