Crime News: तू बिडी का प्यायलास? बायकोने नवऱ्याला असलं मारलं की तो मेलाच.. मेल्यानंतरही घातल्या लाथा, शेजाऱ्यांनी शूट केला व्हिडिओ

Wife killed husband saying why you smoke bidi : सोनीपतच्या गढी सराई गावात पूनमने पती सुरेशला बिडी ओढल्याबद्दल विटा-काठीने ठार मारले. मृत्यूनंतरही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना शेजाऱ्यांनी व्हिडीओ काढला; पोलिसांनी अटक केली.
crime news

Wife beats husband to death in Sonipat over bidi dispute and continues assault after death

esakal

Updated on

Sonipat crime news : हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील गढी सराई नामदार खान गावात सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पत्नी पूनम हिने पती सुरेश (वय ६०) याला बिडी ओढल्याच्या कारणावरून विटांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने सुरेशचा जागीच मृत्यू झाला. याहीपेक्षा भयानक बाब म्हणजे मृत्यूनंतरही पूनमचा राग शांत झाला नाही. ती अंगणातील खाटेवर बसून लाथा, बुक्क्या आणि कंगव्याने मृतदेहावर वार करत राहिली. आता पुन्हा वीट फेकते बघ..असे ती बडबडत होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com