

The most brutal 'Kolhapur child murder case' in Indian criminal history.
Sakal
भारतीय गुन्हेगारीच्या इतिहासात अशी काही प्रकरणे घडली आहेत, ज्यांची क्रूरता ऐकून आजही अंगावर काटा उभा राहतो. असाच एक थरार १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्रात घडला होता. पैशांची चोरी करताना कोणी आपल्यावर संशय घेऊ नये म्हणून चक्क लहान, निरागस मुलांचे अपहरण करायचे आणि काम झाले की त्यांचा क्रूरपणे शेवट करायचा असा अमानुष खेळ आई आणि तिच्या दोन मुलींनी तब्बल सहा वर्षे चालवला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे हेच ते कुप्रसिद्ध 'कोल्हापूर बालहत्याकांड' अर्थात 'रेणुका शिंदे आणि सीमा गावित प्रकरण'!