

Bhopal child abuse case shocks Madhya Pradesh after a 75-year-old lawyer was arrested under POCSO. Child abuse, POCSO case, lawyer arrest.
esakal
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बालवाडीत शिकणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर एका ७५ वर्षांच्या वकिलाने लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये पाठवले आहे. पीडित चिमुरडीचे वडील संरक्षण दलात अधिकारी आहेत. ही निष्पाप चिमुरडी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी आरोपीच्या घरी गेली होती, जिथे त्याने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी 'पॉक्सो'कायद्यांतर्गत आणि बलात्काराशी संबंधित इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.