Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना
CSMT Crime News: सीएसएमटीबाहेर धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका तरूणाने पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्याच्या प्रयत्न केला असून पोलिसांनी वेळीच तरूणाला ताब्यात घेतल्याने प्रसंग टळला आहे.
मुंबई : लोकल प्रवासातील वादातून तरुणाची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आवारात पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशास पोलिसांनी वेळीच ताब्यात घेत पुढील प्रसंग टाळला.