धक्कादायक घटना! मुंबईत सात वर्षांच्या चिमुकलीवर वॉचमनकडून लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Mumbai Crime News : या घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पायधुनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.
Crime

Crime

sakal

Updated on

मुंबईतून संतापजनक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर एका गोदामातील सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पायधुनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com