esakal | चिंचवडमध्ये तरुणाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

खून

चिंचवडमध्ये तरुणाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणावर कोयता व चाकूने वार करून खून करण्यात आला. ही घटना चिंचवडमधील बिजलीनगर येथे घडली. गणेश मरिअप्पा याद्रामी (वय २०, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: सेतू अभ्यासक्रमाची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी ‘संशोधन’

आरोपी व गणेश यांचे दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, शनिवारी (ता. ४) सायंकाळी साडे सातच्या सुमारास गणेश हे बिजलीनगर येथील शिवनगरी कॉलनी येथे असताना तेथे आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयता व चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत

loading image
go to top