esakal | सेतू अभ्यासक्रमाची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी ‘संशोधन’
sakal

बोलून बातमी शोधा

setu

सेतू अभ्यासक्रमाची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी ‘संशोधन’

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी, सेतू अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. आता या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संशोधन करणार आहे. यासाठी परिषदेमार्फत सर्वेक्षण हाती घेतले आहे.

यावर्षी परिषदेमार्फत इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी व सामाजिक शास्त्र या विषयांसाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रम पूर्वीची अध्ययन स्थिती पूर्व चाचणीद्वारे जुलै २०२१ मध्ये माहिती संकलन केली आहे. त्यानुसार या संशोधनासाठी आता अंमलबजावणी नंतरची स्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इयत्ता २ री ते ८ वी या इयत्तांमधील ज्या विद्यार्थ्यांचा सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी पूर्वीची तपासण्यासाठी समावेश केला होता. त्याचीच तपासणी केली जाणार आहे.

त्यासाठी https://www.research.net/r/bridgecoursepoststudy या ‘मंकी’ लिंकच्या माध्यमातून उत्तर चाचणी देण्यात येत आहे. इयत्तानिहाय सर्व विषयांची एकत्रित प्रश्‍नपत्रिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विषयावरील प्रश्‍नांचा समावेश केला आहे. हे सर्वेक्षण ता. १५ सप्टेंबरपर्यंत संपवायचे आहे. अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक यांच्या सहकार्याने माहिती संकलित करण्यासाठी उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना सूचना केल्या आहेत.

हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी स्वीकारलं ऑनलाईन शिक्षणाचं आव्हान

‘‘मंकी लिंकचा वापर करून आपापल्या कार्यक्षात्रतील विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. दररोज किती विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे. याविषयी संशोधन विभागाच्या मेलवर पाठवायची आहे. विद्यार्थी सर्वेक्षणाची लिंक कोणत्याही शिक्षकांना अथवा मुख्याध्यापकांना फॉरवर्ड न करण्याच्या सूचना केल्या आहेत.’’

-एम.डी.सिंह, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

हेही वाचा: मतदार यादीत युवकांची टक्केवारी वाढविण्याची गरज

अशाप्रकारे होईल सर्वेक्षण

  • इयत्ता २ री ते ८ वी पूर्व चाचणीतील विद्यार्थ्यांची होईल तपासणी.

  • केंद्र प्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण साधन व्यक्ती तसेच विशेष फिरते शिक्षक सर्वेक्षण करणार

  • सर्वेक्षणासाठी एक प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे, त्यानुसार एका लिंकवर ही माहिती भरावयाची आहे.

  • डायटचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्यामार्फत संनियंत्रण केले जाणार आहे.

loading image
go to top