

Man Kills Ex Girlfriend Files Missing Report Then Flees
Esakal
अमेरिकेत भारतीय तरुणानं एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून भारतात पलायन केलंय. अर्जुन शर्मा असं आरोपीचं नाव असून तो कोलंबियात राहत होता. त्यानं एक्स गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर विमानानं तो थेट भारतात आला. याबाबत हॉवर्ड काउंट पोलिसांनी सांगितलं की, २ जानेवारीला एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. अर्जुन शर्मा यानेच ही तक्रार दिली होती. त्याने म्हटलं होतं की एक्स गर्लफ्रेंड निकिता गोदिशाला हिला ३१ डिसेंबरला पाहिलं होतं. ती एलिकॉट सिटीत राहत होती.