Young Woman Assaulted After Job Offer : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून आरोपींनी तिला उदला-बालासोर राज्य राजमार्गावर नेलं आणि तिथे वाहनात तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.