

Online gaming obsession leads to shocking family theft case
Esakal
ऑनलाइन गेमिंगच्या नादात लाखो रुपये गमावल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत घडले आहेत. अनेकजण कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. आता एका अल्पवयीन तरुणाने ऑनलाइन गेमिंगसाठी आईचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. थोडे थोडके नाही तर तब्बल १५ लाखांचे दागिने तरुणाने चोरी केले. त्यानंतर मित्राच्या घरी ते दागिने लपवले होते. गेमिंगसाठी पैसे हवे असल्यानं त्यानं चोरी केल्याचं आता समोर आलंय.