Fraud Case
sakal
नवी मुंबई : सायबर भामट्यांच्या टोळीने नेरूळमधील एका ९० वर्षीय निवृत्त दाम्पत्याला डिजिटल अरेस्टच्या बनावट जाळ्यात अडकवून तब्बल एक कोटी ५७ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, दूरसंचार विभाग आणि रिझव्ह बँकेच्या नावाचा गैरवापर करून हो कोट्यवधींची लूट केली असून नवी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.