Three Minor Sisters Die in Ghaziabad
esakal
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे तीन सख्या अल्पवयीन बहिणींनी मध्यरात्री नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. ऑनलाईन गेम्सच्या व्यसनातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं आहे. यासंदर्भात आता त्यांच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या घटनेनंतर त्यांनी माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.