

Gas Blast Plan to Murder UPSC Aspirant Police Arrest Woman Partner and Two Friends
Esakal
दिल्लीत युपीएससीची तयारी करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाचा घरातील सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत फ्लॅटमध्ये आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना शॉर्ट सर्किटने घरात आग लागल्याची किंवा गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिल्लीच्याच अमृता राव हिनं लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरची पूर्वनियोजित पद्धतीने हत्या केली. रामकेश मीना असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर तरुणीचं नाव अमृता असं आहे.