esakal | wakad: कुटुंबाला टाकलं वाळीत चौदा जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

pune

wakad: कुटुंबाला टाकलं वाळीत,चौदा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड : पुरोगामी महाराष्ट्रात आणि विद्येच्या माहेरघरात लाजिरवाणी घटना घडली आहे. जातपंचायतीतून घटस्फोट का घेतला नाही म्हणून कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले. ३ वर्षांपासून वाळीत टाकले शुभकार्य व नातेवाईकांच्या अंत्यविधीला येण्यास बंदी घातली. हा प्रकार मार्च २०१८ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान वाकड येथे घडला. याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने वाकड पोलिसात फिर्याद दिली असून जात पंचायतीच्या पंचासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात तेरा लाख मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप

 जातपंचायतीचे पाटील (पंच) करेप्पा मारुती वाघमारे व त्यांची तीन मुले बाजीराव वाघमारे, साहेबराव वाघमारे,  बाळकृष्ण वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन उगाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णु वाघमारे,  अमृत भोरे, गोविंद वाघमारे या जात पंचायत चालविनाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादीचे पत्नी सोबत कौटुंबिक वाद सुरू होते समजाविण्यासाठी बाजीराव वाघमारे व सासरे दिलीप भोरे हे गावचे पाटील, नातेवाईक, पंच मंडळींसह फिर्यादीच्या घरी आले. समाजात तुम्हाला कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवनार नाही, यापुढे तुम्हाला कुठल्याही सुख-दु: खात सहभागी होता येणार नाही, कोणीही कुंकु लावणार नाही (वाळीत टाकणे) असा तोंडी ठराव करुन निघूूून गेले. त्यानंतर फिर्यादीने डिसेंबर २०१८ ला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला तर पत्नीने फिर्यादीसह त्यांचे आई-वडील व मामावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला. 

२९ डिसेंबर २०१८ रोजी फिर्यादी लग्नाला गावी गेले असता तुम्हाला वाळीत टाकले असून तुमच्या सोबत संबंध ठेवणाऱ्यांनाही वाळीत टाकले जाईल असे वाळपत्र  मैदर्गी (सोलापुर) येथील लग्नात सोडत कुंकु बंदचा ठराव करण्यात आला. फेब्रुवारी २०१९ मध्ये वारजे माळवाडीत चुलत्यांच्या मयतीच्या पाचव्या दिवशीच्या तांब्यात पैसे टाकण्याच्या रितीरिवाजस मज्जाव केला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे मारहाण करुन फिर्यादीचा चष्मा फोडला. त्यांच्याशी बोलणाऱ्या नातेवाईकांना वाळीत टाकण्याची धमकी दिली. मनुष्य जिवंत असल्याची जिवगंता (वर्गणी) बंद केली. चुलत बहिणीच्या लग्न पत्रिकेत फिर्यादीच्या वडिलांचे नाव टाकले म्हणून पंचांनी चुलत्यांची सुध्दा जीवगंता घेणे बंद केले.

हेही वाचा: मला जेलमध्ये माेबाईल अन् सीमकार्ड आणून दे'

पुराव्या अभावी पोलीस फिर्याद घेत नसल्याने साडेतीन वर्षांपासून हे कुटुंब अन्याय सहन करत होते. नातेवाईक, पै-पाहुण्यांनी जात पंचायतीला घाबरून बोलणे तोडले, ये-जा बंद केली तर पीडित कुटुंबालाही समाजातील शुभकार्यात वा सुख-दुःखात जाता येत नव्हते त्यामुळे होणारी कुचंबना अन अपमान या मानसिक त्रासामुळे फिर्यादीच्या वडिलांना  हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांची ओपन हार्ट तर आईची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. अखेर वाकड पोलिस त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत.

loading image
go to top